काय पण गंमत आहे बोलण्यात , आपण ‘शब्द’ किती पटकन बदलतो, | LHM

 काय पण गंमत आहे बोलण्यात , 

आपण ‘शब्द’ किती पटकन बदलतो,

कशालाही नावं देताना आपण त्यांच्या ‘स्थान’ वरून ठरवतो.


नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला

‘खड्डा’ म्हणून हिणवतो.......

तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला ‘खळी’ म्हणून खुलवतो.......


भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला ‘डाग’ म्हणून डावलतो.......

तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला ‘तीळ’ म्हणून गोंजारतो.......


तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला

‘जटा’ म्हणून हेटाळतो.......

तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला ‘बटा’ म्हणून सरकवतो.......


असचं असतं आपल्याही आयुष्यात


आपल्या ‘सोबती’ नेच आपण तसे घडतो.......


चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो


’योग्य’ सोबतीने अधिक बहरतो...


एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत ‘आकाश’ आणि ‘आभाळ’ असे दोन शब्द वापरलेत... 

दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... 

मग असे दोन वेगळे शब्द का ..?


शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा.. त्या म्हणाल्या..


...चुकतोयस तू प्रविण...


  ..जे निरभ्र असते ते आकाश..

आणि..

:

:

:

  ..जे भरून येते ते आभाळ..!!


...आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या.. * *त्या भगवंताच्या असिम कृपेला,

त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर ‘आभाऴमाया’ म्हणतात ..!!

 

अशीच आभाळमाया तूम्हा सर्वांवर राहू देत. दिवाळी सुंदर गेलीच असेल. पुढील वर्ष आनंदी व भरभराटीचे जाऊदे  ईश्वर चरणी हीच प्रार्थना.

🙏🙏🙏













#startup #entrepreneur #entrepreneur
#entrepreneurship #marketing #smallbusiness #success #motivation
#entrepreneurowner #digitalmarketing
#money #entrepreneurlife #branding
#inspiration #startups #startuplife
#startupbusiness #innovation #instagram #technology #hustle
#design #love #mindset #instagood
#lifestyle #entrepreneurs #goals
#tech

Comments

Popular posts from this blog

ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution

Time Management - PART 1

Personal Value and Ethics