*माझे जे पेन्शनर्स मित्र आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा....!!💐👍👍

 आज  "पेंशनर्स डे". सगळ्या  पेंशनर्सना

आणि  त्यांच्या  कुटुंबियांना  मनापासून

             खूप खूप शुभेच्छा

_____________


सर्व निवृत्ती वेतन धारकांना

खूप   खूप   शुभेच्छा

आरोग्यासह शतायुषी व्हावे

हीच आमची सदिच्छा  ||१||


अठ्ठावन-साठ  हे  काय

निवृत्तीचं वय असतं

तेव्हाच आपलं खरं तर

दुसरं बालपण सुरू होतं ||२||


मोकळा  वेळ  भरपूर   असतो

अंगात   उसनं  बळ  असतं

उत्साह ओसंडून वहात असतो

आणि कुठलंही बंधन नसतं  ||३||


जबाबदाऱ्या  संपल्या  असतात

आर्थिक  ताण  उरला नसतो

वरिष्ठांचे       बॉसिंग      नसते

धावपळ सुध्दा संपली असते  ||४||


आपल्या   मनाचे   आपण   राजे

सगळं काही आपण ठरवणार

केव्हा  उठायचं  केव्हा  झोपायचं

हे  निर्णय  आपलेच असणार  ||५||


बायको  नुसती  राबत  होती

तिला द्यायला वेळ नव्हता

आता  तिला  सारं  द्यायचय

निर्णय माझा झाला आता  ||६||


मुलांचं   विश्व   वेगळं   झालं

त्यांचे  संसार थाटले गेले

आमच्या  साठी   वेळ   नाही

त्यांच्या संसारात ते रमले  ||७||


तब्येत   चांगली  आहे  तोवर

इच्छा  साऱ्या  पूर्ण  करू

आनंदाचे     क्षणन्      क्षण

गोळा करून बेगमी करू  ||८||


अजून  खूप  खूप जगायचं  आहे

जमलं नाही ते करायचं आहे

आप्त,  मित्रां सवे   दंगा-मस्तीत

पुन्हा   थोडं   रमायचं   आहे  ||९||


जुनं   सारं   फेकून   देऊ

नव्याने सुरूवात करू

पुन्हा उभारी घेऊन आता

राहिलेले  जगून  घेऊ  ||१०||

__________

*माझे जे पेन्शनर्स मित्र आहेत त्यांना  खूप  खूप  शुभेच्छा....!!💐👍👍

Comments

Popular posts from this blog

ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution

Time Management - PART 1

Personal Value and Ethics