शेतकरी उत्पादक कंपनी

 स्थापन करा शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजक व्हा...............


शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ?


शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतक-यांचे गट, समूह इकत्रीत आणले जातात परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे, जसे की गुंतवणूक करणे, नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे, नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे, विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाय-प्रोडक्ट बनविणे, कंपनी मार्फत खरेदी-विक्री केंद्र उभारणे, मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किव्हा मालाची श्रेणी ठरवणे, मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे, कंपनी सदस्यांनी उत्पादित केलेला माल कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करणे, सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे.


उत्पादक कंपनी नोंदणी साठी किमान आवश्यकता 


• किमान १० शेतकरी सभासद

• १० सदस्यांमधील किमान ५ संचालक असणे आवश्यक.

• प्रत्येक सदस्याचा ७/१२ उतारा व शेतकरी असल्याच्या दाखला आवश्यक 

. आधारकार्ड ,मतदानकार्ड,दोन फोटो,


• प्रत्येक सदस्याचे कायदेशीर दस्तऐवज आणि इतर कागदपत्रांची पूर्तता आवश्यक.


शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे विविध फायदे आणि योजना कोणत्या?

• शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

• सन २०१९-२० च्या बजेट मध्ये ऑपरेशन ग्रीनला मंजुरी 

• शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता 

• नाबार्ड कडून सवलतीच्या दारात कर्ज उपलब्धता तसेच विविध प्रकल्पांना अनुदान 

• नाबार्डच्या प्रोड्युसर ऑर्गनायजेशन डेव्हलोपमेंट फंड (PODF) तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध 

• कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी 

• सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादक कंपन्यांना दिल्या जातात.

• समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान अगदी सुलभतेने उपलब्ध करून दिले जाणार 

• राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकल्प आणि योजना उत्पादक कंपन्या साठी सुरु करण्यात येणार 

• इक्विटी  ग्रॅन्ट योजना: SFAC, Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना १५ लाख रुपये पर्यंत इक्विटी ग्रॅन्ट दिली जाते.

• क्रेडिट ग्यारंटी फंड: SFAC, Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५% किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण व कमी व्याज दाराने दिले जाते.

• अवजारे बँका: महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बँका सुरु झालेल्या असून उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्र सामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्ताने दिले जातात.

• स्मार्ट (SMART) प्रकल्प: जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्राज अग्रिब्युजिन्स अँड रूरल ट्रान्सफॉर्मशन (स्मार्ट) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार. या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रोजेक्ट दिले जाणार. 

• बिनव्याजी बिनातरण प्रकल्प कर्ज: शेतकरी उत्पादक कंपन्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे १० लाख रुपये बिनातरण बिनव्याजी प्रकल्प कर्ज दिले जाणार.


शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी व इतर कायदेशीर बाबींचे व्यवस्थापन क्षेत्रात प्रमुख सेवा प्रदान करते. कंपनीने आजपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये तसेच राज्याच्या बाहेर अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे तसेच त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना विविध योजना व शासकीय अनुदान घेण्यास मदत करते.


शेतकर्यांना शेतकरी उत्पादक कंपनीची (एफपीसी) १० ते १५ दिवसांच्या आत अतिशय कमी खर्चासह नोंदणी करण्यास मदत करते. 

राज्यात विविध ठिकाणी शेतकरी कंपन्या स्थापण केल्या आहेत


CONTACT 

Chetan Bhutada - 8855098984

Suyog Kabra- 7030971007



#promptreg #promptregtechnology #cabrabhutada #aurangabad #sambhajinagar 

#companysecretary #icsi #icai #cs #csstudents #charteredaccountant #ca #castudents #csexecutive #csprofessional #commerce #cafinal #csfoundation #gst #icaistudents #charteredaccountants  #commercestudents #cafoundation  #cajokes #calife #accountant #camotivation #cainter #cseet #accounting

Comments

Popular posts from this blog

ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution

Time Management - PART 1

Personal Value and Ethics