संधी

 संधी


मित्रानो ग्रेट मॉर्निंग  ,

एकदा ट्रेनिंग चालू असताना मला कोणीतरी  विचारले संधी सगळ्यानाच येते का ? की त्यात नशिबाचा भाग असतो ? मी सांगितले संधी येते तर सतत आणि सगळ्यांच्याच आयुष्यात पण ती पकडतात खुप थोडेजण . 

मग दुसऱ्या एकाने विचारले असे का ?

मला गेल्या शतकातील महान लेखक नेपोलियन हिल यांचे वाक्य आठवले ते म्हणत

" संधी ही बहुतेक वेळा वेशांतर करुन येते कधी दुर्दैवाचे रुप घेऊन तर कधी तात्पुरत्या अपयश किंवा पराभवाच्या रुपात येते "

म्हणुनच संधी ओळखता आली पाहिजे.नकारात्मक विचार संधी ओळखायला सर्वात मोठा अडथळा ठरतात आणि म्हणुन नेहमीच स्वतःला सकारात्मक ठेवले पाहिजे .आपण महान यशस्वी लोक पाहिले तर कळेल त्यांनी त्यांच्या संकटानाच ध्येयपूर्तीसाठी मैलाचे दगड बनवले .

ज्ञानेश्वरानी समाज त्यांना नाकारत होता तेंव्हाच ज्ञानेश्वरी लिहिली आज आठशे वर्ष समाज त्यांचे विचार मस्तकी धारण करतो आहे.

शिवाजी महाराजांनी तर प्रत्येक संकटाचे रुपांतर स्वराज्य निर्माण आणि विस्तार करण्यात करुन दाखवले.

थोर लोकांचे आयुष्य पाहिले तर कळते संकटे त्यांनाही आली पण त्यांनी त्यातील संधी शोधली .

म्हणुनच आपणआजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस ग्रेट करायचा तर येणाऱ्या संकटात ,अडचणीत असणारी संधी शोधायलाच हवी आणि ती शोधायची सवयही लावुन घ्यायला हवी.

ग्रेट दिवसा साठी ग्रेट शुभेच्छा पुन्हा एकदा ग्रेट मॉर्निंग

Comments